Thu, Apr 25, 2019 12:04होमपेज › Ankur › फॉर्मेलिनचा वापर कशासाठी होतो?

फॉर्मेलिनचा वापर कशासाठी होतो?

Published On: Aug 11 2018 1:24AM | Last Updated: Aug 11 2018 1:24AMफॉर्मेलिन एक रसायन आहे. ज्याचा वापर जैविक नमुने संरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. फॉर्मेलिनमध्ये 37 टक्के फॉर्मेलडिहाईड, 10 ते 15 टक्के मिथेनॉल व उर्वरित पाणी असे मिश्रण असते. रंगहीन असे हे रसायन जंतुनाशक तर असतेच पण मांसपेशी किंवा उती यांना काठिण्य प्रदान करण्याचा याचा विशेष गुणधर्म आहे.

याच गुणधर्मामुळे या रसायनात जैविक नमुने व अवयव संरक्षित राहतात. याशिवाय व्यावसायिक मत्स्यशेतीमध्ये माशांवरील जंतूंचा नाश करण्यासाठी तसेच कुक्कुटपालन व्यवसायात अंड्यांवरील बुरशी नष्ट होण्यासाठी फॉर्मेलिनचा वापर होतो.