Sun, Oct 20, 2019 06:03होमपेज › Ankur › ट्रॅक्टर

ट्रॅक्टर

Published On: Nov 03 2018 1:25AM | Last Updated: Nov 02 2018 8:30PMआधुनिक शेती ट्रॅक्टरशिवाय अशक्य आहे. शेतीची अनेक कामे ट्रॅक्टरमुळे वेगात व अचूक रितीने करता येतात. ट्रॅक्टरमुळे अनेक मानवी श्रम तासांची बचत झाली आहे. शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेल्या ट्रॅक्टरच्या शोधामागे रिचर्ड ट्रेव्हीथिक, विल्यम टक्सफोर्ड, थॉमस एव्हिलिंग, जॉन फोअलर सारख्या संशोधकांची प्रेरणा असली तरी आधुनिक ट्रॅक्टर जॉन फ्रोलिच याने 1892 साली अमेरिकेत बनवला. हा ट्रॅक्टर गॅसोलिन म्हणजे पेट्रोलवर चालणारा होता. नांगरणी व पेरणी या ट्रॅक्टरद्वारे करता यायची; पण फ्रोलिचची ही ट्रॅक्टर बनवणारी कंपनी बुडीत निघाली.

व्यावसायिक द‍ृष्ट्या यशस्वी ट्रॅक्टर 1901 साली डॅन अल्बोन या ब्रिटिश संशोधकाने बनवला. या ट्रॅक्टरला ‘इव्हेल अ‍ॅग्रीकल्चरल मोट’ असे नाव दिले गेले. अमेरिकेत व जगभर शेती क्षेत्राची वाढ होत गेली तशी ट्रॅक्टरची मागणीही वाढत गेली. अनेक नवनव्या प्रकारचे ट्रॅक्टर बनू लागले. विविध ऊर्जा स्त्रोत वापरणारे, शेतीची अनेक कामे करणारे ट्रॅक्टर शेतकर्‍याचे श्रम कमी करू लागले व उत्पादन वाढवू लागले. आधुनिक शेतकर्‍याचा खरा मित्र म्हणजे ट्रॅक्टर आहे, हेच या शोधाने सिद्ध केले.