Fri, Jul 03, 2020 23:11होमपेज › Ankur › ज्ञानात भर : ‘फाईव्ह-जी’चा फायदा

ज्ञानात भर : ‘फाईव्ह-जी’चा फायदा

Last Updated: Nov 09 2019 2:08AM
भारतातील 50 कोटी लोक अद्याप ‘टूजी’ तंत्रज्ञान वापरत असताना चीन, कोरियात ‘फाईव्ह-जी’ तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवातही झाली आहे. आता रशियातही हुवाई व झेडएक्सई या कंपन्यांच्या माध्यमातून चीन हे तंत्रज्ञान पोहोचवणार आहे. चीनच्या माध्यम अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार फाईव्ह-जी तंत्रज्ञानामुळे वेगवान इंटरनेट सुविधा, उत्तम दळणवळण तंत्रज्ञान, वाहतूक व वैद्यकीय सुविधा देणे शक्य होणार आहे. ऊर्जा व वेळेची बचत करणारे हे तंत्रज्ञान आहे. दूरस्थ ठिकाणच्या  प्रदेशांना या तंत्रज्ञानामुळे जगाशी जोडणे शक्य होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, इ लर्निंग, उपग्रह तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन व मनोरंजन अशा विभिन्‍न क्षेत्रात प्रगतीची गती वाढवणे हे या तंत्रज्ञानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.