Tue, Jun 18, 2019 11:13होमपेज › Ankur › द सॉल्ट मिराज-2000

द सॉल्ट मिराज-2000

Published On: Jun 08 2019 1:54AM | Last Updated: Jun 08 2019 1:54AM
बालाकोट या दहशतवाद्याच्या ठिकाणाची ज्या लढाऊ विमानांनी धूळधाण केली ते द सॉल्ट मिराज-2000 लढाऊ विमान अतिशय आधुनिक विमान आहे. द सॉल्ट एव्हिएशन या फ्रेंच कंपनीद्वारे निर्मित एक इंजीन असलेले विविध युद्धपयोगी कामासाठी उपयोगी पडणारे विमान चीन- भारत, युएई व फ्रान्स या मोजक्या देशांच्या हवाई दलात समाविष्ट आहे. या विमानात फ्लाय बाय वायर तंत्रज्ञानाचा समावेश आहे. याचा अर्थ वैमानिक संगणकाला आदेश देतो व संगणक विमान चालवतो. या विमानात दोन मशिनगन्स असतात ज्यातून प्रतिमिनिट 1,200 ते 1,800 राऊंडस शत्रूवर फायर केले जाऊ शकतात.

हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे, सुमारे 1 हजार किलो वजनाचे बॉम्ब या लढाऊ विमानात असतात. यात दोन पायलटस असतात. रडार व आधुनिक बाँबसाइट्स या यंत्रणेने सुसज्ज असलेले हे विमान हवेतल्या हवेत इंधन भरून घेऊ शकते. एक मिनिटात सुमारे 17 हजार मीटर्सची उंची हे विमान गाठू शकते. या विमानाचा वेग दर ताशी 2,336 कि.मी. एवढा प्रचंड आहे. हे विमान भारतीय वायू दलाच्या शिरपेचातील एक तुरा आहे.