Wed, Feb 20, 2019 14:43होमपेज › Ankur › दहा लाखमोलाचे गाढव

दहा लाखमोलाचे गाढव

Published On: Jul 07 2018 1:38AM | Last Updated: Jul 06 2018 6:52PMबैल, गाय किंवा घोड्यासारखे पाळीव प्राणी कधीकधी अत्यंत किमती असू शकतात पण गाढवासारखा प्राणी दहा लाख किमतीचा असू शकतो यावर कोणाचा विश्‍वास बसणार नाही. हरयाणा राज्याच्या सोनीपत येथील रजनिश या शेतकर्‍याकडे असलेले गाढव चक्‍क दहा लाख किमतीचे आहे.

या गाढवाची बडदास्तही त्याच्या किमतीप्रमाणे तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. या गाढवाच्या रोजच्या खुराकाचा खर्च 1 हजार रुपये आहे. सकाळी पौष्टिक लाडू, दिवसभर चणे व दोनवेळा गोड जेवण या गाढवाला देण्यात येते. एखाद्या पहिलवानाला जसे रोज मालिश केले जाते त्याप्रमाणे या गाढवालाही मालिश करण्यात येते. पंजाब, उत्तर प्रदेश या शेजारच्या राज्यांतून या गाढवाला बघायला अनेक लोक येतात. अनेक श्रीमंत लोकांनी गाढव विकत घेण्यासाठी दहा लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. तरीही रजनिश या गाढवाला विकायला राजी नाही.