Wed, Oct 24, 2018 04:43होमपेज › Ankur › शिवांगी पाठक

शिवांगी पाठक

Published On: Aug 11 2018 1:24AM | Last Updated: Aug 11 2018 1:24AMहरियाणा राज्यातील हिस्सार जिल्ह्यात राहणारी शिवांगी पाठक केवळ सोळा वर्षांची आहे. या कोवळ्या वयात या बालिकेने जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करून जगाला चकित केले. माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकवणार्‍या व वयाने सर्वात लहान भारतीय गिर्यारोहक होण्याचा मान शिवांगीने मिळवला आहे. शिवांगीने या कठीण मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी अनेक महिन्यांचे गिर्यारोहणाचे खडतर प्रशिक्षण नवी दिल्‍लीच्या जवाहर इन्स्टिट्यूट येथे घेतले. काश्मीरच्या अनेक दुर्गम गिरीशिखरांना सर केल्यानंतरच तिने एव्हरेस्टवर चढाई करण्याचे ठरविले.

शिवांगीने एव्हरेस्ट सर करणारी पहिली दिव्यांग  गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा हिच्यावरचा एक लघुपट पाहिला. हा लघुपट पाहिल्यानंतर शिवांगीला वाटले की आपणही गिर्यारोहणही करू शकतो. आपल्या यशाचे श्रेय शिवांगी अरुणिमा सिन्हालाच देते. गिर्यारोहण करण्याबरोबर शिवांगी अभ्यासावरही लक्ष देते. लहान वयातच स्वत:च्या हिमतीवर यशाचे शिखर गाठणार्‍या शिवानीने स्त्रिया पुरुषांपेक्षा कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत हे परत एकदा दाखवून दिले आहे.