होमपेज › Ankur › प्रतिजैविकांमुळे प्रदूषित नद्या

प्रतिजैविकांमुळे प्रदूषित नद्या

Last Updated: Jan 18 2020 1:33AM

संग्रहित फोटोथेम्सपासून टायग्रिसपर्यंत व गंगेपासून अ‍ॅमेझॉनपर्यंत जगातील बहुतांश नद्या प्रतिजैविकांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहेत, असा निष्कर्ष एका संशोधनात काढण्यात आला आहे. औषध निर्मिती कंपन्यांद्वारे नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी तसेच मानव व प्राण्यांची विष्ठा यामुळे रासायनिक प्रतिजैविके नद्यांमध्ये पोहोचत आहेत. यामुळे जगातील महानगरांजवळ वसलेल्या अनेक नद्या धोकादायक पातळीपर्यंत प्रदूषित झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पाण्यातील या प्रतिजैविकांमुळे अनेक जीवाणू व विषाणू औषधांना दाद न देणारी पिढी बनवू शकतात. 
प्रदूषित पाण्यामुळे मानवी आरोग्याला धोकादायक अशा रोगांच्या साथी उद्भवू शकतात, असेही संशोधनात म्हटले आहे.