Mon, Nov 20, 2017 17:19होमपेज › Ankur › क्रांतिकारक शोध, गुरुत्वीय लहरी

क्रांतिकारक शोध, गुरुत्वीय लहरी

Published On: Nov 11 2017 2:17AM | Last Updated: Nov 10 2017 8:40PM

बुकमार्क करा

गुरुत्वीय लहरीबद्दल महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी शतक भरापूर्वीच भाकीत केले होते. मात्र, गुरुत्वीय लहरींचा प्रत्यक्ष वेध घेऊन त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यास शंभर वर्षे 
लागली. गुरुत्वीय लहरीच्या या महत्त्वपूर्ण शोधाबद्दल अमेरिकन खगोल शास्त्रज्ञ रेनर वाईस, बॅरी बॅरीश व किप थॉर्न यांना भौतिक शास्त्रासाठीचा 2017 चा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
    विश्‍वातील महास्फोटक घटना उदा. दोन कृष्णविवरांचे किंवा तार्‍यांचे एकमेकांवर आदळणे यातून गुरुत्वीय लहरींची निर्मिती होते. अणुकेंद्रकाच्या हजारो पटींनी सूक्ष्म अशा या लहरी लायगो म्हणजे ‘दी लेसर इंटरफेरोमीटर ग्रेव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी’ या उपकरणांच्या मदतीने टिपण्यात या शास्त्रज्ञांना यश आले. लायगो उपकरणाने 130 कोटी वर्षांपूर्वीच्या खगोलीय घटनेतील गुरुत्वीय लहरींचा अचूक वेध घेतला होता. सुमारे चार दशके कठोर परिश्रम केल्यानंतर या लहरींचा वेध घेण्यात शास्त्रज्ञांना यश आले. या प्रकल्पात वीस देशांतील अनेक संस्था व हजारो शास्त्रज्ञ सामील झाले होते. भारतातील टाटा मूलभूत संशोधन  संस्था व आयुका या दोन संस्थांचाही यात समावेश आहे. या शोधामुळे विश्‍वातील विविध घडामोडींचा अभ्यास करणे शक्य होणार आहे. तसेच अनेक खगोलीय घटनांमागच्या कारणांवर प्रकाशझोत पडणार आहे.