Mon, Jun 17, 2019 10:13होमपेज › Ankur › क्रांतिकारक शोध : ओएलईडी टीव्ही

क्रांतिकारक शोध : ओएलईडी टीव्ही

Published On: Oct 06 2018 1:45AM | Last Updated: Oct 05 2018 6:51PMएलईडी किंवा एलसीडी टीव्हीबद्दल आपल्याला माहीत आहेच. ओएलईडी टीव्ही हे नवे तंत्रज्ञान आहे. ओएलईडीचा अर्थ आहे ऑर्गेनिक लिक्विड एमिटिंग डायोड. सामान्य एलईडी टीव्ही व ओएलईडी टीव्ही यात फरक असा की ओएलईडी तंत्रज्ञानात दोन कंडक्टर्समध्ये ऑर्गेनिक कार्बन फिल्मचा वापर केला जातो. ओएलईडी तंत्रज्ञानाचे पासिव्ह  मॅट्रिक्स व अ‍ॅक्टिव्ह मॅट्रिक्स असे दोन प्रकार आहेत.

ओएलइडी तंत्रज्ञान असलेले टीव्ही वजनाने हलके व पातळ असतात. ओएलईडी तंत्रज्ञानात प्रत्येक पिक्सेल ऑन व ऑफ करता येत असल्याने या टीव्हीची पिक्चर क्वॉलिटी इतर टीव्हीहून अतिशय चांगली असते. हे तंत्रज्ञान असलेल्या टीव्हीतील रंग अधिक गहिरे व सुस्पष्ट असतात. तसेच ओलईडी टीव्ही पर्यावरणस्नेही आहेत. याची निर्मिती करताना सेंद्रिय पदार्थांचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान नवे असल्याने ओएलईडी टीव्ही इतर टीव्हीपेक्षा थोडे महाग आहेत.