Sun, Oct 20, 2019 07:08



होमपेज › Ankur › आईचा सल्‍ला

आईचा सल्‍ला

Published On: Dec 08 2018 1:24AM | Last Updated: Dec 07 2018 10:21PM




एकदा एक भुकेला सिंह बराच वेळ एका गायीला व तिच्या दोन बछड्यांना गवतात लपून बसून पाहत होता. त्या दोन बछड्यांपैकी एक जरी आईपासून दूर गेले तर त्याच्यावर झडप घालण्याचा त्याचा इरादा होता. पण तसे काही होण्याची चिन्हे दिसेनात. पावसाळ्यात उगवलेले ताजे गवत खाण्यात ते मग्‍न होते.

उतावळा झालेला सिंह स्वत:वर नियंत्रण ठेवू शकला नाही. गवतात लपत-छपत तो त्या बछड्यांपैकी सर्वात तरुण बछड्याजवळ गेला.“श्ाू!” सिंह हळूच कुजबुजला.तरुण बछडा सिंहाच्या कुजबुजण्याने दचकला व एक पाऊल मागे सरकला.

“घाबरू नकोस, मी तुला अशा ठिकाणी नेईन जिथले गवत इथल्या गवतापेक्षा गोड आहे.”सिंहाने मधाळ स्वरात बछड्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला.

बछड्याने आपल्या आईकडे पाहिले पण ती चारा खाण्यात मग्‍न होती.
“चल माझ्याबरोबर ये.” सिंह पुन्हा कुजबुजला. त्या लहानग्या बछड्याला ताजे, लुसलुशीत गवत खाण्याचा मोह आवरला नाही. कोणत्याही परिस्थितीत आईपासून लांब न जाण्याचा तिचा सल्‍ला तो विसरला आणि तो सिंहाबरोबर चालू लागला. अर्थात त्या बछड्यावर सिंहाने लवकरच ताव मारला हे सांगायला नकोच.