Thu, Mar 22, 2018 09:46होमपेज › Ankur › ज्ञानात भर,सोयाबीनचे दूध

ज्ञानात भर,सोयाबीनचे दूध

Published On: Dec 02 2017 12:29AM | Last Updated: Dec 01 2017 8:41PM

बुकमार्क करा

ज्या लोकांना प्राणीजन्य दुधापासून अ‍ॅलर्जी आहे अशा लोकांनी सोयाबीनपासून बनवलेल्या दुधाचे सेवन केल्यास त्यांना फायदा मिळू शकतो, असे एका नव्या संशोधनात सिद्ध झाले आहे. सोयाबीन या वनस्पतीपासून मिळवलेले दूध कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते, मधुमेहाच्या रुग्णांमधील रक्तदाब नियंत्रित ठेवते. 

वजन नियंत्रित ठेवण्यात व हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते. सोयाबीनच्या दुधात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असल्याने व फायबर म्हणजेच चोथ्याचे प्रमाण जास्त असल्याने सोयाबीनच्या दुधाचे सेवन नेहमीच फायदेशीर ठरते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.