Tue, Sep 17, 2019 19:55



होमपेज › Ankur › अजब-गजब : लाखो रुपयांची अंडी

अजब-गजब : लाखो रुपयांची अंडी

Published On: Sep 07 2019 2:05AM | Last Updated: Sep 07 2019 2:05AM




कॅव्हियार म्हणजेच स्टर्जन माशाची अंडी हे जगातील सर्वात महागडे समुद्री अन्‍न मानले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात प्रती किलो सुमारे 35 हजार डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांत 24 लाख 35 हजार एवढा दर असलेले कॅव्हियार 19 व्या शतकात अतिशय स्वस्त होते. 

रशियात खाणावळीत कॅव्हियार मोफत दिले जायचे. कधीकधी डुकरांचे खाद्य म्हणूनही याचा वापर केला जायचा. स्टर्जन माशांची संख्या विपुल असल्यामुळे 19 व्या शतकात कॅव्हियारची कमतरता कधी भासली नाही. स्टर्जन माशांची संख्या कमी होऊ लागली तसतसे कॅव्हियारचे महत्त्व वाढू लागले. फ्रेंच पाकतज्ज्ञांनी कॅव्हियारचा उपयोग पंचतारांकित रेसिपीमध्ये सुरू केला. युरोपात महागड्या हॉटेलात कॅव्हियार खाणे हे श्रीमंतीचे लक्षण मानले जाऊ लागले. यामुळेच काळ्या रंगाच्या साबुदाण्याप्रमाणे दिसणार्‍या या माशांच्या अंड्यांना महत्त्व आले.