Wed, Feb 20, 2019 15:29होमपेज › Ankur › क्रेन

क्रेन

Published On: Jul 07 2018 1:38AM | Last Updated: Jul 06 2018 6:54PMक्रेन नसेल तर विशाल बांधकामे करणे अशक्यप्राय गोष्ट बनेल. या क्रेनचा शोध प्राचीन ग्रीक लोकांनी लावला हे सांगितले तर तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. सुमारे 2600 वर्षांपूर्वी ग्रीक लोकांना मंदिरे व मोठमोठ्या वास्तू बांधण्यासाठी महाकाय दगड उचलेल अशा उपकरणाच्या निर्मितीची गरज भासली. ग्रीक क्रेन प्रामुख्याने लाकडाची होती. आताच्या क्रेनप्रमाणे त्यामध्ये पुली, विंच व रोप हे तीन घटक होते. आधुनिक क्रेनमध्ये धातूची दोरी वापरली जाते तर ग्रीक क्रेनमध्ये साध्या पण मजबूत दोरखंडाचा वापर व्हायचा.

क्रेनचा शोध कोणी एका व्यक्‍तीने लावला नाही. अनेक ग्रीक संशोधकांनी या क्रेनमध्ये सुधारणा केल्या. नंतर रोमनांनीही त्यांच्या बांधकाम निर्मितीसाठी सोयीस्कर सुधारणा करून रोमन क्रेन बनवली. आधुनिक क्रेनमध्ये इंधनतेल किंवा विजेचा वापर होतो तर प्राचीन क्रेनमध्ये मानवी शक्‍तीचा वापर व्हायचा. आज दिसणार्‍या  प्राचीन अथवा अर्वाचिन गगनचुंबी इमारती व वास्तू यांच्या बांधकामामागे किमान एका तरी क्रेनचा महत्त्वाचा वाटा आहे हे विसरता कामा नये.