Mon, May 25, 2020 21:51होमपेज › Ankur › अजब-गजब : नरभक्षक जोडी

अजब-गजब : नरभक्षक जोडी

Last Updated: Oct 05 2019 12:16AM
आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलिमांजरोच्या पूर्वेला असलेले त्सावो वाळवंट 19 व्या शतकात तेथील रखरखीत भूप्रदेशापेक्षा एका वेगळ्या कारणामुळे बदनाम झाले. त्या वाळवंटातील दोन नरभक्षक सिंहांनी 19 व्या शतकाच्या अंतिम दशकात सुमारे 135 लोकांना मारून खाल्ले. 

‘द घोस्टस् ऑफ डार्कनेस्’ या नावाने ही नरभक्षक सिंहांची जोडी ओळखली जात होती. 1898 साली लेफ्टनंट कर्नल जॉन पॅटरसन या भागात रेल्वे रुळ टाकण्याचे कामकरण्यासाठी आला. त्याच्या लेबर कँपमधील अनेक मजुरांना या सिंहांनी शिकार बनवले. पॅटरसन भारतातून आला होता व पट्टीचा शिकारी होता. तरीही अनेक महिन्यांच्या प्रयत्नानंतर या दोन नरभक्षक सिंहांना मारण्यात त्याला यश आले.

हे सिंह कसे नरभक्षक झाले याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्या काळी गुलामांचे व्यापारी प्रवासात गुलाम मृत झाला की वाळवंटात त्याचे प्रेत फेकून देत. अशा गुलामांच्या मृतदेहावर ताव मारण्याची सवय झाल्याने हे सिंह नरभक्षक झाले असावेत, असा एक अंदाज आहे.