Wed, Oct 24, 2018 02:18होमपेज › Ankur › बाल वीर,एरोमल एस. एम.

बाल वीर,एरोमल एस. एम.

Published On: Dec 02 2017 12:29AM | Last Updated: Dec 01 2017 8:35PM

बुकमार्क करा

 बापू गायधनी पुरस्कार हा भारत सरकारतर्फे बालवीरांना देण्यात येणार्‍या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांपैकी महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो. अतिविशिष्ट साहस दाखविणार्‍या मुलांनाच हा पुरस्कार दिला जातो. 2015 या वर्षीचा बापू गायधनी पुरस्कार एरोमल एस. एम. या केरळातील बालवीराला देण्यात आला. अवघ्या बारा वर्षांच्या या मुलाच्या साहसाची कथा रोमांचक आहे.

केरळात नैसर्गिकरित्या तयार झालेल्या लहान तळ्यांची संख्या भरपूर आहे. अशाच एका तळ्यात दोन महिला स्नान करण्यासाठी उतरल्या होत्या. त्यातील एक महिला बुडू लागल्यावर दुसर्‍या महिलेने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तीही बुडू लागली. हे दृश्य तलावाजवळून जात असलेल्या एरोमलने पाहिले. त्याने लगेच पाण्यात उडी मारून दोन्ही महिलांना सुरक्षितरित्या तलावाच्या काठावर आणले. त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या दोन व्यक्तींना वाचविण्याचे साहस दाखविणार्‍या एरोमलचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.