Wed, Oct 16, 2019 10:06होमपेज › Ankur › आण्विक खेळणे

आण्विक खेळणे

Published On: Nov 03 2018 1:25AM | Last Updated: Nov 02 2018 8:32PMमुलांच्या एखाद्या खेळण्यात किरणोत्सर्गी युरेनिअम असणे, ही कल्पनाच आज अतिशय धोकादायक व विचित्र वाटते. 1950च्या दशकात अमेरिकेत अणुयुगाचे वारे वाहत असताना अल्फ्रेड गिल्बर्ट या संशोधक व जादुगाराने मुलांसाठी  ‘गिल्बर्ट यू 238 अ‍ॅटोमिक एनर्जी लॅब’ नावाचे गेम किट बनवले. या किटमध्ये चक्‍क किरणोत्सर्गी युरेनिअम होते. युरेनिअम 238 या युरेनिअमच्या समस्थानकाचा वापर किटमध्ये केला गेला होता.

किटमध्ये एक क्लाऊड चेंबर होते, ज्यात 12 हजार मैल वेगाने फिरणार्‍या अल्फा कणांना पाहता येत होते. गॅमा रे किरणांनाही अनुभवता येत होते. या किटचे मूल्य त्याकाळी 50 डॉलर्स म्हणजे आताचे 32,000 भारतीय रुपये होते. मुलांना हे खेळणे महाग व वापरण्यास किचकट वाटले. यामुळे सुरुवातीला या किटला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. किटमधील युरेनिअमच्या किरणोत्सर्गाचा दुष्परिणाम मुलांवर होऊ शकतो, हे ध्यानात आल्यावर हे किट घाईघाईने बाजारातून हटवण्यात आले. तोपर्यंत अशी 5,000 किटस् जगभर विकली गेली होती.