होमपेज › Ahamadnagar › सायरन वाजल्याने एटीएम फोडण्याचा डाव फसला 

सायरन वाजल्याने एटीएम फोडण्याचा डाव फसला 

Published On: Aug 12 2018 5:49PM | Last Updated: Aug 12 2018 5:49PMसंगमनेर(जि. अहमदनगर) : प्रतिनिधी 

आश्वी बुद्रुक येथे सेन्ट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न सायरन वाजल्याने फसला  आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल भरबाजारपेठेत असलेले सेन्ट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्‍न चोरट्याकडून करण्यात आला होता. याबाबत दिपक लाड (वय- ३५, रा. वरंवडी, ता. संगमनेर) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सेन्ट्रल बँकेचे आश्वी शाखेचे शाखाधिकारी प्रविण कुभांरे यांनी आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

रविवारी पहाटे ४.३० च्या सुमारास आरोपी दिपक लाड याने आश्वी बुद्रुक येथिल सेन्ट्रल बँकेच्या एटीएममध्ये प्रवेश करत एटीएमचे सेंसर व एटीएम मशीनचा लॉक तोडला. त्यामुळे तेथे असलेले सायरन जोरात वाजण्यास सुरवात झाल्यामुळे आरोपीने गडबडीत सायरणच्या वायरी तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा डाव फसला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेत आरोपीला ताब्‍यात घेतले.