होमपेज › Ahamadnagar › नगर : सराफ दुकान सिनेस्टाईल लुटले, एक ठार

नगर : सराफ दुकान सिनेस्टाईल लुटले, एक ठार

Published On: Aug 19 2018 9:44PM | Last Updated: Aug 19 2018 9:44PMनगर : 

कोपरगाव तालुक्यातील  कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्स हे सराफ दुकान आज रात्री सशस्त्र दरोडेखोरांनी  सिनेस्टाईल लुटून नेले. यावेळी झालेल्या गोळीबारात दुकान मालक शाम सुभाष घाडगे हे मयत झाले, असून त्यांचे बंधू गणेश सुभाष घाडगे हे गंभीर जखमी झाले आहेत.

 रविवारी रात्री साडेसात  वाहनाच्या सुमारास एका वाहनातून शस्त्रधारी  दरोडेखोर लक्ष्मी ज्वेलर्स येथे आले. त्यांनी दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटली. दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुकान मालकांवर गोळीबार केला. यात शाम घाडगे जागीच मयत झाले. तर दोन गोळ्या लागल्याने गणेश घाडगे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी घाडगे यांना उपचारासाठी तातडीने कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी इतरत्र हलविण्यात येणार आहे. घटनेची माहिती मिळताच  पोलिसांचा फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे.  या घटनेमुळे कोपळेवाडी हादरून गेले आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.