Wed, Oct 16, 2019 10:16



होमपेज › Ahamadnagar › मनुवादी वृत्तीचे प्रतिकात्मक दहन

मनुवादी वृत्तीचे प्रतिकात्मक दहन

Published On: Nov 08 2018 1:23AM | Last Updated: Nov 08 2018 1:23AM



नगर : प्रतिनिधी

बलिप्रतिपदेला बळीराजाच्या झालेल्या हत्येच्या निषेध व्यक्त करीत, शबरीमाला प्रकरणात डोके वर काढणार्‍या मनुवादी वृत्तीचे विद्रोही विचार मंचच्या वतीने प्रतिकात्मक दहन करण्यात आले. ईडापिडा टळून बळीचे राज्य येण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

अरणगाव रस्त्यावरील इंदिरानगर येथे जालिंदर चोभे यांच्या नेतृत्वाखाली नरक चतुर्दशीला हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये चंद्रकांत बिरारे, अमोल भालसिंग, बाळासाहेब तिजोरे, जीवन कांबळे, दीपक भिंगारदिवे, विनोद  जाधव, अमोल मीरपगार, नितीन तेलधुणे, अमोल तिजोरे, अभिषेक कदम आदींसह परिसरातील युवक सहभागी झाले होते. महिलांना मंदिरात प्रवेश देण्याबाबत सुप्रिम कोर्टाचे आदेश असतानाही गोंधळ घालून न्यायालयाचा अवमान केला जात आहे. महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश मनुवादी प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. तेथील राज्य सरकारचे पोलिस हतबल झाले असून, न्यायालयाचा अवमान होणे हे लोकशाहीला घातक आहे. याबाबत सर्व राजकीय मंडळी मौन धरुन आहेत. पुन्हा मनुवादी विचारसरणी समाजात सक्रिय होत असल्याने या प्रवृत्तीचे दहन करण्यात आल्याचे विद्रोही विचार मंचच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.