Tue, Sep 17, 2019 03:37होमपेज › Ahamadnagar › नगरः बेलापुरजवळ भीषण अपघातात ५ जण जागीच ठार

नगरः बेलापुरजवळ भीषण अपघातात ५ जण जागीच ठार

Published On: Dec 14 2017 2:22PM | Last Updated: Dec 14 2017 2:33PM

बुकमार्क करा

श्रीरामपूर : प्रतिनिधी

बेलापूर-श्रीरामपूर रस्त्यावर बेलापूर खुर्दजवळ बुधवारी रात्री सव्वा बाराच्या दरम्यान तीन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

मृतांमध्ये नितीन सोनवणे (वय २७), शिवा ढोकचौळे (वय २७, दोघेही रा. रांजणखोल, ता. राहाता), सचिन तुपे (वय २८), भारत मापारी (वय २७, दोघेही रा. भैरवनाथनगर, ता. श्रीरामपूर), सुभाष शिंदे (वय ३०, ब्राम्हणगाव वेताळ, श्रीरामपूर) यांचा समावेश आहे. तर पियुष पांडे (रा. भैरवनाथनगर) हा या अपघातात जखमी झाला आहे.

हे सर्व स्विफ्ट कारमधून (क्रमांक एमएच १७, एसी ९००९) वाढदिवसाच्या पार्टीसाठी देवळाली प्रवरा येथे गेले होते. तेथून ते परत येत असताना बेलापूर खुर्द येथे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन समोरुन येणा-या टँकरवर (क्रमांक एमएच ०४, आर ९६६६) आदळली. त्याचवेळी भरधाव वेगाने येणारी इंडिका कारही (एमएच १७, ६०५५) या कारवर येऊन आदळली. यात स्विफ्ट कारमधील पाच जण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex