Mon, Sep 16, 2019 12:21होमपेज › Ahamadnagar › सुजय विखेंविरोधात राष्ट्रवादीकडून आ.संग्राम जगताप यांना उमेदवारी

सुजय विखेंविरोधात राष्ट्रवादीकडून आ.संग्राम जगताप यांना उमेदवारी

Published On: Mar 20 2019 6:54PM | Last Updated: Mar 20 2019 8:54PM
नगर : पुढारी ऑनलाईन

दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे पाटील यांच्याविरोधात आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. आमदार जगताप भाजप आमदार शिवाजीराव कार्डिले यांचे जावई आहेत.

त्यामुळे नगरमध्ये दोन तरुण नेत्यांमध्ये लढत रंगणार आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या या लढतीमध्ये कोण बाजी मारणार? हे आता २३ मे रोजी स्पष्ट होईल. डॉ. सुजय विखेंविरोधात तगडा उमेदवार शोधण्यासाठी राष्ट्रवादीकडून अनेक नावांवर खल सुरू आहे. शेवटी आमदार संग्राम जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. 

संग्राम जगताप हे नेवासा-राहुरीचे भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावेळी कर्डिले उपस्थित होते.  संग्राम यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे.

आमदार संग्राम जगताप २००९ मध्ये नगर महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यावेळी त्यांना महापौर पदही मिळाले. २०१४ मध्ये नगर मनपामध्ये दुसऱ्या टर्ममध्येही ते निवडून आले. त्यावेळीही ते महापौर पदावर विराजमान झाले.

महापौर पदावर असतानाच त्यांनी २०१४ मध्ये अहमदनगर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला. त्यांनी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचा पराभव केला. पत्नी शितल जगताप विद्यमान नगरसेविका आहेत. आमदार संग्राम जगताप यांनी केडगाव येथील शिवसैनिक हत्याकांड प्रकरणात तीन महिने शिक्षा भोगली आहे.