Fri, Sep 20, 2019 22:03होमपेज › Ahamadnagar › श्रीगोंदा येथे जुगार अड्यावर छापा, ३९ जण ताब्‍यात 

श्रीगोंदा येथे जुगार अड्यावर छापा, ३९ जण ताब्‍यात 

Published On: Dec 05 2018 9:57PM | Last Updated: Dec 05 2018 9:57PMश्रीगोंदा(अहमदनगर) : प्रतिनिधी 

तालुक्यातील गव्हाणेवाड़ी येथे सुरु असलेल्या जुगार अड्यावर अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या पथकाने आज (५) रात्री आठच्या सुमारास छापा टाकत ३९ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाख रूपयांची रोकड़ जप्त करण्यात आली. या कार्रवाइत बारा दुचाकया जप्त करण्यात आल्या आहेत. 

अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना यानी श्रीगोंदा तालुक्यात सुरु असणारी अवैध वाळू तस्करी व इतर अवैध धंदे यांच्या विरोधात धड़क मोहीम सुरु केली आहे. गव्हाणेवाड़ी येथे सुरु असलेल्या जुगार अड्याची माहिती मीना यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने आज रात्री आठच्या सुमारास छापा टाकत तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या ३९ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकड़ले. त्यांच्याकडून दोन लाख रूपयांची रोकड़ जप्त करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली. त्याबरोबर बारा दुचाकी आणि चार मोठी वाहने जप्त करण्यात आली आहेत.