Wed, May 27, 2020 12:41होमपेज › Ahamadnagar › महाराष्ट्र बचाव आंदोलनात माजी मंत्री प्रा. राम शिंदे कुटुंबासह सहभागी

महाराष्ट्र बचाव आंदोलनात माजी मंत्री प्रा. राम शिंदे कुटुंबासह सहभागी

Last Updated: May 22 2020 1:15PM
चोंडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सहभाग

जामखेड (अहमदनगर) : पुढारी वृत्तसेवा -

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजन व समन्वयात पूर्णत: अभाव राहिल्याने महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरले आहे. याप्रश्नी राज्य सरकारला धारेवर धरण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पुकारलेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनात सहभागी होताना मुळगाव चोंडी ( ता.जामखेड जि.अहमदनगर ) येथील घरासमोर माजी मंत्री प्रा. राम शिंदे, त्यांच्या पत्नी, माजी सभापती सौ. आशाताई राम शिंदे, ममुलगा अजिंक्य, चोंडीचे  सरपंच अभिमन्यु सोनवणे, चोंडी सेवा संस्थेचे चेअरमन विलास जगदाळे, उपसरपंच पांडुरंग उबाळे उपस्थित होते.