Wed, May 27, 2020 11:21होमपेज › Ahamadnagar › नगरमध्ये कोरोनाने वृद्ध महिलेचा मृत्यू 

नगरमध्ये कोरोनाने वृद्ध महिलेचा मृत्यू 

Last Updated: May 22 2020 1:20AM
नगर: पुढारी वृत्तसेवा 

नगर शहरात गुरुवारी एका 67 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालेे. या शिवाय बुधवारी रात्री उशिरा दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 69 झाली आहे. 

संबंधित मृत्यू झालेली महिला नगर शहरातील रामचंद्र खुंट परिसरातील आहे. या महिलेवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या रुग्णालयाने तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी खासगी मान्यताप्राप्त लॅबकडे पाठवला होता. तो पॉझिटिव्ह आला. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता 6 झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. 

जिल्हा रुग्णालयाने मंगळवारी पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे 48 अहवाल पाठविले होते. ते बुधवारी रात्री उशिरा प्राप्‍त झाले. त्यापैकी 45 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह, तर तीन अहवाल पॉझिटिव्ह आले.  पॉझिटिव्हमध्ये संगमनेर शहरातील रहमत नगर येथील बाधीत व्यक्तीची पत्नी, नगर शहरातील जुना मंगळवार बाजार येथील एक रिक्षाचालक व सुभेदार गल्‍ली येथील बाधित वृध्द महिलेच्या दुसर्‍या अहवालाचा समावेश आहे.