Fri, Feb 22, 2019 14:09होमपेज › Ahamadnagar › ‘ओएलएक्स’वर केली युवकाची फसवणूक

‘ओएलएक्स’वर केली युवकाची फसवणूक

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 11:23PMनगर : प्रतिनिधी

‘ओएलएक्स’वर मोबाईल विक्रीस असल्याची जाहीरात करून राजस्थानच्या दोघांनी सावेडीतील युवकाची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मुरसलीम खान फजरुखान (वय 26, रा. घाघोर, ता. कामन, जि. भरतपूर, राजस्थान), सद्दाम कासू खान (वय 25, रा. झेंजपुरी, ता. कामन, जि. भरतपूर, राजस्थान) यांचा समावेश आहे. अभिजित मुरलीधर ढाकणे (वय 21, रा. हुंडेकरी शोरुम मागे, नंदनवननगर, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ढाकणे हे ‘ओएलएक्स’ या संकेतस्थळावर अ‍ॅपल कंपनीचा आय फोन खरेदी करण्यासाठी सर्च करीत होते.

राजस्थानच्या एकाने आय फोन विक्रीसाठी असल्याचे दाखविले होते. त्यानंतर ढाकणे यांना ‘पेटीएम’द्वारे 7239991354 या मोबाईल क्रमांकावर 5 हजार 400 रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर कुरिअर बॉयचा 7733838097 हा मोबाईल क्रमांक देऊन तो कुरिअरद्वारे पाठविण्यात येईल, असे सांगितले. प्रत्यक्षात ढाकणे यांना मोबाईल हॅण्डसेट न देता फसवणूक केली. 

याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील पवार हे करीत आहेत.