होमपेज › Ahamadnagar › बिबट्याचा हल्ला; तरूण जखमी

बिबट्याचा हल्ला; तरूण जखमी

Published On: Jan 18 2019 1:36AM | Last Updated: Jan 18 2019 1:11AM
संगमनेर : प्रतिनिधी

शेतातील विद्युत मोटार चालु करण्यासाठी जाणार्‍या तरुणांवर अचानक बिबट्याने प्राणघातक  हल्ला चढवत त्यास गंभीररीत्या जखमी केले. ही घटना सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास चिकणी येथे घडली. संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील सुजीत अशोकराव गुंजाळ (वय 30) हा डोंगरगाव शिवारात आपल्या कुटुंबासह राहतो. काल सकाळी तो शेतात  मोटार चालु करण्यासाठी जात असताना शेतात  दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक प्राणघातक हल्ला चढविला. बिबट्याने सुजितवर हल्ला केला. त्यावेळी  याने स्वतःला सावरत आरडा ओरडा केला आणि  बिबट्याच्या तावडीतून कशीबशी  सुटका करून घेतली. यामध्ये त्याच्या काना व पोटाजवळ  तसेच हाताला जबर जखमा झाल्या.