होमपेज › Ahamadnagar › महिलांचा ग्रामसभेत हंडा मोर्चा

महिलांचा ग्रामसभेत हंडा मोर्चा

Published On: May 03 2019 2:01AM | Last Updated: May 03 2019 12:30AM
पानेगाव : वार्ताहर

नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथे महाराष्ट्र दिनाच्या ग्रामसभेत जाधव, पवार, दरंदले वस्तीवरील महिलांनी हंडा मोर्चा काढला. सोनईसह 18 गावे पाणी योजनेचे चार हजार रुपये ग्रामपंचायतीकडे भरून अधिकृत नळ कनेक्शन घेऊनही अद्यापही तांब्याभर पाणी मिळाले नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. 

ऐन दुष्काळ परिस्थितीत ग्रामविकास अधिकारी उडवाउडवीचे उत्तरे देऊन मूळ प्रश्‍नाला बगल देत असल्याने येथील महिला व पुरुषांची जीव कासावीस होत आहेे. याबाबत वेळोवेळी नेवासा येथे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना भेटून निवेदन सादर करून कुठलीच कारवाई झालेली नसल्याने हे आंदोलन करावे  लागले. यावेळी सुनंदा जाधव, मनीषा जाधव, शकुंतला जाधव, रेणुका जाधव, संगीता पवार, लक्ष्मीबाई पवार, मथुराबाई दरंदले, पूनम पवार, भारती पवार, गोरक्षनाथ जाधव, हरीभाऊ जाधव, आबासाहेब जाधव, सोपान दरंदले, भगिरथ पवार आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या. दिवाळीपर्यंत  पाईपलाईन करणार असून, तोपर्यंत  टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे लेखी आश्‍वासन ग्रामविकास अधिकारी रजनीकांत मोटे यांनी दिले. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex