होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : देशाविरोधी वक्तव्यामुळे विसापुरमध्ये तणावपूर्ण शांतता 

अहमदनगर : देशाविरोधी वक्तव्यामुळे विसापुरमध्ये तणावपूर्ण शांतता 

Published On: Feb 19 2019 3:53PM | Last Updated: Feb 19 2019 3:53PM
विसापूर : वार्ताहर

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे सोमवार ( १८ फेब्रुवारी ) सायंकाळी पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्‍ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोकसभा चालू असताना विसापूरचा माजी सरपंच जब्बार सय्यद भारताविषयी वादग्रस्‍त विधान केले. 

सय्यदच्या त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विसापूरमध्ये तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. दरम्यान सर्व ग्रामस्‍थांनी आपले व्यवसाय बंद करत गावात कडकडीत बंद पाळला. सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत सरकारी यंत्रणाना निवेदन पाठवले असून तीव्र शब्दात रस्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे. यावेळी बेलवंडी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून त्या विसापूरची परीस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर जब्बार सय्यद हा फरार झाला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.