होमपेज › Ahamadnagar › विखे पाटील यांची पाचपुते यांच्याशी गुप्त खलबते

विखे पाटील यांची पाचपुते यांच्याशी गुप्त खलबते

Published On: May 23 2019 1:36AM | Last Updated: May 23 2019 1:36AM
काष्टी : वार्ताहर
लोकसभा निवडणूक झाली, आता पुढील होणार्‍या विधानसभा निवडणूक व जिल्हा परिषदेमध्ये होणार्‍या बदला संदर्भात गनिमी कावा खेळून कोणते डावपेच टाकायचे, यावर  राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांच्यामध्ये नुकतीच काष्टी येथे गुप्त खलबते झाली.यावेळी सहकारमहर्षी सेवा संस्थेचे मार्गदर्शक भगवानराव पाचपुते, जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, सेवा संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव काकडे, यावेळी उपस्थित होते.

श्रीगोंदा तालुक्यात काही गावांत लग्नानिमित्त राधाकृष्ण विखे आले असता या सर्वांची भेट झाली.  पाचपुते यांची साईकृपा दूध डेअरी ( कृष्णाई दुध ) येथे सर्वजण एकत्र आले. यावेळी आगामी विधानसभा निवडणूक कशाप्रकारे लढवायची, त्यासाठी कोणते निर्णय घ्यायचे, जिल्हा परिषदेमध्ये होणारे बदल, कोणाला अध्यक्ष, उपाध्यक्ष बनवायचे, विरोधकांचे डावपेच कसे मोडून काढायचे, भाजपचे संख्याबळ व विखे यांच्याबरोबर आलेले सदस्य यांना एकत्र करून पुन्हा आपलेच जिल्हा परिषदेवर वर्चस्व ठेवायचे ? व सहा महिन्यांवर येवून ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी तालुक्यात कोणाकोणालाबरोबर घेवून श्रीगोंद्याचा  गड जिंकायचा यावर चर्चा झाल्याचे समजते.

लोकसभा निकालानंतर जिल्हा परिषदेत मोठे राजकीय बदल होणार असल्याने अध्यक्षपद सदाशिव पाचपुते यांना मिळू शकते. जर ते नको म्हणाले तर आढळगाव जिल्हा परिषदेच्या सदस्या पंचशिला रमेश गिरमकर यांना लॉटरी लागू शकते, अशीही चर्चा आहे.