होमपेज › Ahamadnagar › त्यांनी शिवसेनेची पुस्तिका वाचावी : दरेकर

त्यांनी शिवसेनेची पुस्तिका वाचावी : दरेकर

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 11:15PMश्रीगोंदा : प्रतिनिधी

भाजपने मागील तीन वर्षांत किती पारदर्शी कारभार केला, हे समजून घेण्यासाठी शिवसेनेने काढलेली घोटाळेबाज भाजपा ही 56 पानांची पुस्तिका आधी वाचावी व नंतरच गल्ला भरणार्‍या भाजपने राष्ट्रवादीवर डल्ला मारण्याचा आरोप करावा. त्यापूर्वी तीन वर्षांत किती गल्ला भरला, याचाही हिशोब करावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी प्रा. तुकाराम दरेकर यांनी दिला आहे.

भाजपच्या आरोपाला उत्तर देताना प्रा. दरेकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाने भाजप हबकला आहे. त्यामुळे वाटेल तसे आरोप भाजप करीत आहे. गेल्या तीन वर्षांत चिक्की घोटाळा, जमीन घोटाळा, व्यापम घोटाळा, कारगिल शवपेटी घोटाळा, खाण घोटाळा, निर्गुंतवणूक घोटाळा, कर्जवाटप घोटाळा, तूरडाळ घोटाळा, आदिवासी साहित्य घोटाळा, बँक घोटाळा, सोलर पंप घोटाळा,अग्निशामक यंत्र खरेदी घोटाळा, राफेल विमान घोटाळा, असे कितीतरी घोटाळे समोर आले आहेत.

भाजपने कारगिल शवपेटी घोटाळा, रिलायन्स प्रसारण खात्यातील घोटाळा, यूटीआय घोटाळा, सायबर स्पेस घोटाळा, पेट्रोल पंप व गॅस एजन्सी वाटपातील घोटाळा, दिल्ली जमीन वाटप घोटाळा, राजस्थानात हुडको जमीन घोटाळा, बेल्लारी खाण आणि रेड्डी ब्रदर्स घोटाळा, मध्यप्रदेशातील कुशाभाऊ ठाकरे ट्रस्ट घोटाळा, कर्नाटकातील येडियुरप्पा जमीन वाटप घोटाळा, पंजाबमधील लाचखोरीचे प्रकरण, उत्तरखंडातील जलविद्युत घोटाळा, छत्तिसगड मधील  खाण घोटाळा, पुणे जमीन घोटाळा, उत्तरखंडातील  गॅसवर आधारित विद्युत प्रकल्प घोटाळा, बनावट पायलट घोटाळा, लखनौमधील अरविंद पार्क घोटाळा, दिल्ली आयटी भूखंड घोटाळा, बाल्को निर्गुंतवणूक घोटाळा, जैन हवाला प्रकरण, राम मंदिर प्रकरणातील वर्गणी आदी घोटाळे केले आहेत. ते सर्व आधी तपासा. उगीच काचेच्या घरात राहून दुसर्‍यांच्या घरांवर दगड मारण्याचे धंदे करू नका, असा सल्लाही प्रा. दरेकर यांनी भाजपला दिला आहे.