Mon, Jun 17, 2019 11:08होमपेज › Ahamadnagar › संक्रांतीला ज्वारीचे कणीस झाले दुर्मिळ

संक्रांतीला ज्वारीचे कणीस झाले दुर्मिळ

Published On: Jan 13 2019 1:36AM | Last Updated: Jan 12 2019 11:15PM
कौठा : वार्ताहर

मकरसंक्रांतीच्या काळात अनेक फळाबरोबर हरभरा, गहू, बोर याच बरोबर ज्वारीचे कणसाच्या विशेष महत्त्व आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने ज्वारीचे पिक नसल्याने ज्वारीच्या कणसाची उणीव भासणार आहे. 

नेवासा तालुक्यात पूर्वी कौठा, रस्तापूर, नारायणवाडी, महालक्ष्मी हिवरा, कारेगाव, मांडे मोरगव्हान आदी भागामध्ये ज्वारी पिकांचे आगार समजले जात असे. याकाळात भरमसाठ ज्वारीचे उत्पादन घेतले जात होते. ज्वारीच्या पेरण्या झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात धान्य घरात राहायचे. आता बागायती भागामुळे ज्वारीऐवजी ऊसाला प्राधान्य दिले जात आहे. 

मकरसंक्रांतचा सण जवळ आला आहे. या सणाला अन्य फळांबरोबर ज्वारीच्या कणसाला खूप महत्त्व आहे. बदलती पीकपद्धती आणि सततचा दुष्काळी परिस्थिती यामुळे बदलत्या काळानुसार सणासुदीच्या काळात ज्वारीच्या कणसाला महत्वाचे असतानाही ते कणीस सर्वांना आज दुर्मिळ झाले आहे. 

दुष्काळामुळे शेतकर्‍यांवरच संक्रात आली आहे. त्यामुळे यंदा सक्रांतीच्या सणावरच सक्रांत आली आहे.