होमपेज › Ahamadnagar › पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी सुरू

पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी सुरू

Published On: Feb 13 2018 2:05AM | Last Updated: Feb 13 2018 12:35AMनगर : प्रतिनिधी

केडगाव येथील दोन जागांसाठी होणार्‍या पोटनिवडणुकीची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. या निवडणुकीत शिवसेना-भाजपाच्या युतीसंदर्भात लवकरच वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येणार आहे, असे शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी सांगितले.

रिक्‍त झालेल्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीसंदर्भात सातपुते यांच्या उपस्थितीत केडगाव येथे बैठक झाली. यावेळी सातपुते म्हणाले की, या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून विजय पठारे, हर्षवर्धन कोतकर, रमेश परतानी, प्रमोद ठुबे, वसंत शिंदे, भाकरेमहाराज, अभिजीत कोतकर इच्छुक आहेत. युतीबाबत वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेतला जाणार आहे. शिवसेनेच्या माध्यमातून केडगावला मोठी विकासकामे झाली आहेत. त्यामुळे जनता शिवसेनेच्या पाठिशी आहे.

या भागात शिवसेनेला मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. उमेदवाराच्या पाठीशी पूर्ण ताकद लावून दिलेल्या जागांवरील उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणू. याप्रसंगी शिवसेनेच्या प्रवक्तापदी रमेश परतानी यांची एकमताने निवड करण्यात आली.