Mon, Sep 16, 2019 11:34होमपेज › Ahamadnagar › शिर्डीतून सदाशिव लोखंडेंना शिवसेनेची उमेदवारी जाहीर

शिर्डीतून सदाशिव लोखंडेंना शिवसेनेची उमेदवारी जाहीर

Published On: Mar 23 2019 1:13AM | Last Updated: Mar 23 2019 1:13AM
मुंबई : खास प्रतिनिधी 

शिवसेनेच्या 21 उमेदवारांची यादी आज जाहीर झाली. परभणी आणि हिंगोली येथील उमेदवारांमध्ये बदल करण्यात आले असून, अन्य जागांवर आधीच्याच खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

परभणीतून संजय जाधव, तर उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आज ही नावे जाहीर केली. सातारा मतदारसंघातून उदयनराजे यांच्याशी कोण टक्‍कर घेणार, हे अजून गुलदस्तातच असले, तरी माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना तेथून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. येत्या 24 तारखेला कोल्हापुरात होणार्‍या युतीच्या महामेळाव्यात सातारा आणि पालघर या दोन जागांवरील उमेदवारांची घोषणा होईल, असे सुभाष देसाई यांनी सांगितले. प्रचारतज्ज्ञ प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसार ही यादी तयार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेना उमेदवारांची पहिली यादी

दक्षिण मुंबई - अरविंद सावंत,  दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे,  उत्तर पश्‍चिम - गजानन किर्तीकर, ठाणे - राजन विचारे, कल्याण - श्रीकांत शिंदे, रायगड - अनंत गिते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत, कोल्हापूर - संजय मंडलिक, हातकणंगले - धैर्यशील माने, नाशिक - हेमंत गोडसे, शिर्डी - सदाशिव लोखंडे, शिरूर - शिवाजीराव आढळराव-पाटील, औरंगाबाद - चंद्रकांत खैरे,  यवतमाळ-वाशीम- भावना गवळी, बुलडाणा - प्रतापराव जाधव, रामटेक - कृपाल तुमाने, अमरावती- आनंदराव अडसूळ, परभणी - संजय जाधव, मावळ - श्रीरंग बारणे, हिंगोली - हेमंत पाटील, उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर.