Mon, Jul 13, 2020 22:57होमपेज › Ahamadnagar › राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा

संगमनेर : नगरसेवक अभंग यांच्‍याकडून बाद नोटा जप्त 

Published On: Jul 20 2018 5:51PM | Last Updated: Jul 20 2018 5:51PMसंगमनेर : प्रतिनिधी

चालनातून बाद झालेल्या  तीन कोटीच्या नोटा पोलिसांनी पकडल्या आणि पाच जणांना ताब्यात घेतले.  त्यात  संगमनेर नागरपालिकेचा  नगरसेवक गजेंद्र अभंग  याचाही समावेश असल्यामुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

एक हजार आणि पाचशे रुपयाच्या तीन कोटी रुपयांच्या नोटा जप्त 

 पुण्यातील खडक  पोलिसांना  चालनातून बाद झालेल्या  नोटा बदलविण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.  त्यानुसार पोलिसांनी खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापळा लावला तेव्हा पोलिसांना  संगमनेर नगरपालिकेचा नगरसेवक गजेंद्र अभंग,  राहणार बीएड कॉलेज जवळ संगमनेर  यांच्यासह पुण्यातील विजय अभमन्यू शिंदे,  राहणार, वाकडेवाडी खडकी,  आदित्य विश्वास चव्हाण,   राहणार मुळशी पुणे,   सुरेश पांडुरंग जगताप,  राहणार फलटण जि. सातारा आणि नवनाथ काशीनाथ   भांडगळे,   राहणार  कर्वे नगर पुणे या  पाच जणांकडून खडक पोलिसांनी  जुन्या चलनातील बाद झालेल्या एक हजार आणि पाचशे रुपयाच्या तीन कोटी रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत. या पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

अभंग हे आयकर विभागाच्या जाळ्यात 

काँग्रेसचे नगरसेवक गजेंद्र अभंग यांच्याकडे एक दोन नाही तर तीन कोटीच्या चालनातून बाद झालेल्या एक हजार आणि पाचशेच्या नोटा पुण्यात पकडल्याची वार्ता संगमनेरात येऊन धडकताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. नगरसेवक  अभंग याच्याकडे एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद होऊन दोन वर्षे झाले तरी एवढ्या जुन्या नोटा नेमक्या कोठून आल्या  आणि कशा आल्या.  याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.  आता अभंग हे आयकर विभागाच्या जाळ्यात अडकले असून  त्यांची आयकर विभागाचे अधिकारी चौकशी करत आहेत.   परंतु अभंग यांनी एवढे पैसे  कोठून व कशासाठी आणले याबाबतही उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.