Fri, Sep 20, 2019 21:29होमपेज › Ahamadnagar › संभाजी ब्रिगेड आगामी निवडणुका लढविणार! : पुरुषोत्तम खेडकर

संभाजी ब्रिगेड आगामी निवडणुका लढविणार! : पुरुषोत्तम खेडकर

Published On: Oct 08 2018 1:22AM | Last Updated: Oct 08 2018 1:22AMसंगमनेर : प्रतिनिधी

ज्याप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री  होऊ शकतो, तसा मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचाही पंतप्रधान आणि मुख्यमंत्री झाला, तर आम्हाला आनंद होईलच, त्यासाठी 2019 मध्ये होणार्‍या निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड सक्रिय होऊन  निवडणुका लढविणार असल्याचे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी  जाहीर केले.

मराठा सेवा संघाची जनसंवाद यात्रा संगमनेरात आली असता शासकीय विश्रामगृहावर ते बोलत होते.  यावेळी  मराठा सेवा संघाचे प्रा. अर्जुन तनपुरे, राज्य कार्यकारिणी सदस्य रमेश गुजर, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुंजाळ, तालुकाध्यक्ष विजय उगले, अकोले तालुकाध्यक्ष दिलीप शेणकर, डॉ. माणिकराव शेवाळे, संभाजी ब्रेगेडचे राज्य समन्वयक सोमनाथ नवले, तालुकाध्यक्ष मंजाबापू गुंजाळ, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा डॉ. दीपाली पानसरे, सचिव डॉ. वीणा वाणी, प्रवीण कानवडे, संदीप शेळके आदी  उपस्थित होते.

खेडेकर म्हणाले की, मराठा विरुद्ध मराठे असे वातावरण तयार होऊ नये आणि आमच्यातील काही कार्यकर्त्यांमध्ये असणारे आपापसातील मतभेद आणि   गैरसमज दूर करून सर्वांना एकत्रित आणत पुन्हा एकदा मराठा सेवा संघाला उर्जितावस्था प्राप्त व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून  जनसंवाद यात्रा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी खेडेकर यांनी मराठा मोर्चा,  शालेय विद्यार्थ्यांचे प्रश्‍नी तसेच  आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या समस्यांवरही बोलताना सरकारचे लक्ष वेधले.

मराठा क्रांतीचा फारसा प्रभाव पडणार नाही

मराठा क्रांती मोर्च्याच्या नावाने लेबल लावून मोर्चे निघाले. म्हणजे  मराठा समाज हा  मराठा पक्षाला मतदान करेल, असे तरी मला वाटत नाही. मात्र, भावनिक म्हणून तरुणाचे आकर्षण वाढले, तर थोडा फार फरक पडू शकतो. अन्यथा फारसा फरक पडेल असे मला वाटत नाही, असेही खेडेकर म्हणाले.