Fri, Jun 21, 2019 00:34होमपेज › Ahamadnagar › आज तुमची सत्ता, उद्या आमची : विखे-पाटील

आज तुमची सत्ता, उद्या आमची : विखे-पाटील

Published On: Dec 09 2017 5:21PM | Last Updated: Dec 09 2017 5:21PM

बुकमार्क करा

राहुरी : प्रतिनिधी

‘भाजपमध्ये प्रवेश करून खासदार व्हावे’असे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी डॉ. सुजय विखे-पाटील यांना सांगितले. डॉ. तनपुरे कारखान्याच्या गाळप शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. त्यांना विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्याच शैलीत उत्तर दिले. यावेळी राजकीय जुगलबंदी चांगलीच रंगात आली होती.

राज्याचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कर्डिले यांना उत्तर देताना म्हटले की,‘आज सत्ता तुमची आहे. उद्या आमची येईल, त्याऊलट तुम्हीच खासदार नाना पटोले यांचा आदर्श घेत शेतकर्‍यांना न्याय म्हणून आमदारकीचा राजीनामा द्या.’

डॉ. सुजय विखे-पाटील व आ. शिवाजीराव कर्डिले यांनी एकमेकांच्या सोबत राहून विकास कामे करावीत असा सल्ला विखे-पाटील यांनी दोघांना दिला. यामुळे आता डॉ. सुजय विखे भाजप की कॉंग्रेसकडून निवडणूक लढवणार याबाबत चर्चा रंगली आहे.