Sat, Aug 17, 2019 19:47होमपेज › Ahamadnagar › श्रीगोंदा नगरपालिकेचे मतदान २७ जानेवारीला

श्रीगोंदा नगरपालिकेचे मतदान २७ जानेवारीला

Published On: Dec 27 2018 6:42PM | Last Updated: Dec 27 2018 6:42PM
श्रीगोंदा : प्रतिनीधी

श्रीगोंदा नगरपालिकेसाठी २७ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील तीन नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आली आहे. त्यात श्रीगोंदा नगरपालिकेचा समावेश आहे.

दिनांक २ ते ९  जानेवारी दरम्यान इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. दहा जानेवारीला उमेदवारी अर्जांची छानणी व त्यानंतर वैध उमेदवारी अर्जाची यादी जाहीर केली जाईल. १७ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चिन्हांचे वाटप होईल. २७ जानेवारी रोजी मतदान होऊन त्यानंतर २८ जानेवारीला सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरूवात होईल.