Fri, Sep 20, 2019 21:28होमपेज › Ahamadnagar › पोलिसाचा कलाकेंद्रात गोंधळ

पोलिसाचा कलाकेंद्रात गोंधळ

Published On: Sep 09 2018 2:11AM | Last Updated: Sep 08 2018 11:44PMजामखेड : प्रतिनिधी

बीड येथील एका भाजप आमदाराच्या सुरक्षारक्षकाने जामखेड येथील कलाकेंद्रात गोंधळ घातला.  रिव्हॉल्वर दाखवून दमबाजी केल्याची घडली. याबाबत सदर व्यक्तीला जामखेड पोलिसांनी फक्त चौकशी करून सोडून दिले. याबाबत जामखेड व बीडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे

जामखेड येथील कला केंद्रावर दि. 7  रोजी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी सदर व्यक्तीला चौकशी करून सोडून दिले. ही घटना घडली तरी देखील गुन्हा दाखल करण्यात आला नाही.सध्या जामखेड शहरात गोळीबाराच्या सतत घटना घडत आहेत. यात दोन युवकांना जीवही गमवावा लागला आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. तालुक्यात अवैध धंदे, खासगी सावकारकी यातूनच गुंडगिरी वाढली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक गुन्ह्यातील फरार आरोपी शहरात राजरोसपणे फिरत आहेत. पोलिस डायरीत ते मात्र फरार आहेत. यातील अनेकजन राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत.  सत्ताधारी भाजपा आमदाराच्या बॉडीगार्डने कलाकेंद्रात रिव्हॉल्वर दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. धुडगूस घालूनही जामखेड पोलीसांनी केवळ चौकशी करून सोडून दिले.  खाकीनेच खाकीला वाचवण्याचा प्रयत्न केला. खाकीचा धाक फक्त सर्वसामान्य नागरिकांनाच आहे का? अशी चर्चा शहरात जोरदारपणे सुरू आहे.