Fri, Sep 20, 2019 21:40होमपेज › Ahamadnagar › अहमदनगरच्या पोलिस अधीक्षकपदी इशू सिंधू 

अहमदनगरच्या पोलिस अधीक्षकपदी इशू सिंधू 

Published On: Feb 25 2019 10:44AM | Last Updated: Feb 27 2019 1:14AM
नगर : प्रतिनिधी

दिल्ली महाराष्ट्र सदनातील उपायुक्त इशू सिंधू यांची नगरच्या पोलिस अधिक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तर नगरचे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची नागपूर गुन्हे अन्वेषण विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाने याबाबतचा आदेश काढला आहे. 

उपायुक्त सिंधू यांनी यापूर्वी औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक, नागपूर पोलिस उपायुक्त, जळगाव अप्पर पोलिस अधीक्षकपदी काम केले आहे. सिंधू हे दिल्लीतील सहारनपुर येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या पत्नी निरुपमा सिंधू या भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या केल्याचे सांगण्यात येत आहे.