Sun, May 19, 2019 15:53
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › नगरमध्ये लाखो रुपयांची मुदतबाह्य कीटकनाशके जप्त

नगरमध्ये लाखोंची मुदतबाह्य कीटकनाशके जप्त

Published On: May 16 2019 5:33PM | Last Updated: May 16 2019 6:59PM

नगर : प्रतिनिधी

मुदतबाह्य झालेले कीटकनाशके पुन्हा मार्केटमध्ये विकण्याचा प्रकार नगरमध्ये घडला आहे. कृषी विभागाचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण पथकाने नगरच्या मार्केटमधील पृथ्वी ॲग्रो सर्व्हिसेसच्या गोदामावर  आज (ता.१६) सायंकाळी चार वाजता छापा घालून मोठ्या प्रमाणात कीटकनाशके जप्त केले. 

मुदतबाह्य झालेले कीटकनाशकांवरील लेबल बदलून त्यावर नव्याने लेबल लावण्याचा प्रताप पृथ्वी ॲग्रो सर्व्हिसेसच्या गोदामांमध्ये होत होता. कृषी विभागाच्या पथकाने तेथे छापा मारला. या गोदामांमध्ये मुदतबाह्य कीटकनाशके आढळली. त्या कीटकनाशकावरील वेस्टन बदलून तेथे नव्याने वेस्टन लावली जात होती. त्यासाठी लागणारे साहित्य ही भरारी पथकाने जप्त केले. त्यामध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या वेस्टन, शिक्के, बाटल्या, ब्लेड आणि थिनर आदी साहित्यचा यात समावेश आहे. 

जप्त केलेला मुदतबाह्य कीटकनाशकांचा मुद्देमाल लाखो पेक्षा अधिक रुपयांचा असल्याचे सांगितले जात आहे. मुख्य गुणवत्ता नियंत्रक दीपक पानपाटील, मोहीम अधिकारी राजेश जानकर, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नीतनवरे आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम. आर. देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली.