होमपेज › Ahamadnagar › आचारसंहिता ‘23 मे’पर्यंत!

आचारसंहिता ‘23 मे’पर्यंत!

Published On: Apr 25 2019 1:43AM | Last Updated: Apr 25 2019 12:49AM
नगर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी नगर दक्षिण मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असली तरी मतमोजणी होऊन संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (23 मे) लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कायम राहणार आहे. नगरमध्ये मतदान पार पडल्यामुळे काही प्रमाणात आचारसंहितेचे निर्बंध शिथिल होणार असले तरी महापालिका प्रशासनाचे अधिकारी मात्र संभ्रमात आहेत.

निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यापासून संपूर्ण जिल्ह्यासह नगर शहरातही आचारसंहिता लागू आहे. नगर दक्षिण मतदारसंघातील मतदान पार पडले आहे. तर शिर्डी मतदारसंघात 29 एप्रिलला मतदान होणार आहे. 
आचारसंहितेमुळे मागील महिनाभरापासून महापालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. नगर दक्षिण मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असली तरी जिल्ह्यात मतमोजणी होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे. 
मात्र, नगर मतदारसंघात काही प्रमाणात आचारसंहितेचे निर्बंध शिथील होणार आहेत. त्यामुळे महिनाभर ठप्प असलेले मनपाचे कामकाज पूर्ववत होणार असले, तरी आचारसंहितेच्या शिथीलतेबाबत व निर्बंधाबाबत मनपा प्रशासन संभ्रमात असल्याचे चित्र आहे.