होमपेज › Ahamadnagar › काळ्या फिती बांधून काढले निषेध मोर्चे 

काळ्या फिती बांधून काढले निषेध मोर्चे 

Published On: Feb 16 2019 1:45AM | Last Updated: Feb 16 2019 12:33AM




नगर : तालुका प्रतिनिधी

जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखील पोलिस दलाच्या ताफ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा नगर तालुक्यातील गावागावांत तीव्र निषेध करण्यात आला. काळ्या फिती बांधून निषेध मोर्चे, फेर्‍या काढून नागरिकांनी संताप व्यक्त केला. यामध्ये शाळकरी मुलेही सहभागी होत रस्त्यावर  उतरल्याचे पहावयास मिळाले.

नगर तालुक्यातील खडकी  येथे संपूर्ण गावाने या भ्याड हल्ल्याचा निषेध करत या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. गावातील श्री तुळजाभवानी आजी-माजी सैनिक सेवा संघाच्या कार्यालयासमोर सर्व ग्रामस्थ, जिल्हा परिषद शाळा, तसेच माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी काळ्या फिती लावून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. तेथून गावातील शहीद जवान दत्तात्रय उरमुडे स्मारकापर्यंत गावातून मूक फेरी काढण्यात आली.शहीद स्मारकासमोर मेणबत्त्या पेटवून शहीद झालेल्या जवानांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, माजी सरपंच प्रवीण कोठुळे, राहुल कोठुळे, सरपंच अशोक कोठुळे, उपसरपंच भाऊ रोकडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल कोठुळे, भाऊसाहेब उरमुडे, पंढरीनाथ कोठुळे, अजित काळे, अशोक रोकडे, मारुती कोठुळे, रेवणनाथ कोठुळे, बाळासाहेब निकम, हेमंत कोठुळे, रुपेश बहिरट, अनिकेत कोठुळे, दत्ता कोठुळे, अनिल कोठुळे, विजय काळे, कुंडलिक रोकडे, आनंदा रोकडे, राजू चोभे, अमृता कोठुळे, हरिभाऊ निकम, कुशाबापू रोकडे, युनुस अत्तार यांच्यासह आजी-माजी सैनिक संघाचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी झालेल्या श्रद्धांजली सभेत बाळासाहेब हराळ, प्रवीण कोठुळे यांनी या दहशतवादी हल्ल्याला केंद्र सरकारने जोरदार प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी केली. यावेळी उपस्थित सर्वांनीच बदला घ्या, बदला घ्या, पाकिस्तान ला धडा शिकवा, अशा जोरदार घोषणा दिल्या. या घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून गेले होते.