Mon, Sep 16, 2019 06:19होमपेज › Ahamadnagar › बहुजन वंचित आघाडी जिल्ह्यात लढणार!

बहुजन वंचित आघाडी जिल्ह्यात लढणार!

Published On: Feb 10 2019 1:01AM | Last Updated: Feb 09 2019 10:41PM
नगर : प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. त्यासाठी आघाडीचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा 1 मार्चला क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर होणार असल्याची माहिती आघाडीचे निरीक्षक प्रा. किसन चव्हाण यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते आघाडीचे जिल्हा निमंत्रक अ‍ॅड. अरुण जाधव, डॉ.जालिंदर घिगे, भारिपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, उत्तर जिल्हाध्यक्ष किरण साळवे, एमआयएमचे डॉ. परवेज आशरफी, सरफरोज जहागीरदार, अ‍ॅड. रावसाहेब मोहन, डॉ. सुधीर क्षीरसागर, सुनील शिंदे, जनहित लोकशाही पार्टीचे अध्यक्ष अशोक आल्हाट, लाल निशान पक्षाचे कॉ.अनंत लोखंडे, माजी जि.प.सदस्य प्रकाश भोसले, प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड आदी उपस्थित होते.

या सभेत अ‍ॅड. आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे उत्तर व दक्षिण लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता असल्याचे भारिपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सोनवणे म्हणाले. दलित, मुस्लिम, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी वंचित बहुजन आघाडीत  सहभागी होत आहेत.