Fri, Sep 20, 2019 21:33होमपेज › Ahamadnagar › शिर्डीच्या रस्त्यांसाठी 8 कोटी

शिर्डीच्या रस्त्यांसाठी 8 कोटी

Published On: Jan 11 2019 1:17AM | Last Updated: Jan 11 2019 12:17AM
शिर्डी : शहर प्रतिनिधी

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे शिर्डी शहरातील 24 रस्त्यांकरीता  साईबाबा विश्वस्त व्यवस्था समितीकडून 8 कोटी 97 लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शिर्डीमधील रस्ते चकाचक होणार आहेत. साईभक्तांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. 

शिर्डी शहरात येणार्‍या भाविकांच्या तसेच स्थानिक नागरिकांच्या सोयीकरिता असलेल्या रस्त्यांकरिता शिर्डी संस्थाकडून निधी मिळावा, आशा मागणीचा प्रस्ताव शिर्डी नगर पंचायतीच्या माध्यमातून राज्य सरकारला सादर करण्यात आला होते. यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा निधी मंजूर व्हावा म्हणून प्रयत्न केले होते. 

शासनाच्या विधी व न्याय विभागाने या प्रस्तावाला मान्यता दिली असून, याबाबतचा शासन निर्णय देखील विधी व न्याय विभागाचे कार्यासन अधिकारी सु. प. सांळुखे यांनी निर्गमित केला आहे.  शिर्डी शहराच्या विकासासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी यापूर्वी  निधीची उपलब्धता करून दिली होती. आता शहरातील 24 रस्त्यांकरिता 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने शहराच्या विकासाचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. 

प्राप्त होणार्‍या निधीतून ओमसाईनगरचा मुख्य रस्ता, गायकवाड वस्ती रस्ता डांबरकरण, पटेल कॉलनी रस्ता, संदीप पारख ले ऑउट रस्ता, झुलेलाल मंदिर लगतचा रस्ता, माऊली नगरमधील रस्ता, शिंदे वस्ती रस्ता, साई पंढरीनगरी रस्ता, पिंपळवाडी ते एसटीपी रस्ता, नवनाथ शेळके वस्ती रस्ता, सम्राटनगरमधील रस्ता, साईप्रयाग सिटी, वीरभद्रनगर मधील रस्ते आदींचे कामे होणार आहेत. यामुळे उपनगरामधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्यांची कामे रखडली होती. यासाठी नागरिकांनी नगराध्यक्षांकडे मागणी केली होती. नगराध्यक्षांनी ना. विखे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. ना. विखेंनी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्यांसाठी निधी  प्राप्त झाला आहे. 

यासर्व रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिर्डी नगर पंचायतीच्या सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकार्‍यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.