Tue, Sep 17, 2019 19:50होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : संगमनेर भूकंपाने हादरले 

अहमदनगर : संगमनेर भूकंपाने हादरले 

Published On: Sep 09 2019 1:05PM | Last Updated: Sep 09 2019 1:05PM

संग्रहित छायाचित्रसंगमनेर : प्रतिनिधी

तालुक्याच्या पठार भागातील घारगाव, बोटा या भागात सतत भूकंपाचे हादरे बसत आहेत. तर सोमवारी सकाळी ८ वाजून ३६ मिनिटांनी बोटा गावासह अकलापूर या भागात भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता २.८ रिस्टर स्केल असल्याचे भूवैज्ञानिकांनी सांगितले.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागाचे शेवटचे टोक असणाऱ्या बोटा व परिसरात काही गावांना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दुसऱ्या व तिसऱ्या आठवडयात सौम्य भूकंपाचे धक्के बसले होते. त्यावेळी या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर आज पुन्हा याच भागात सौम्य भूकंपाचा धक्का बसल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

नाशिक येथील बोटा व अकलापूर येथील मेरी संस्थेच्या भूकंप मापन यंत्रात या भूंकपाची नोंद झाली आहे. तर त्याची तीव्रता २.८ रिस्टर स्केल असल्याची माहिती वरिष्ठ भू-वैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी सांगितले.