होमपेज › Aarogya › रक्तदान  : समज-गैरसमज 

रक्तदान  : समज-गैरसमज 

Published On: Jun 14 2018 2:41PM | Last Updated: Jun 14 2018 2:30PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

रक्तदान  श्रेष्ठदान असे अनेकदा म्‍हटले जाते. मात्र, समाजात काही लोकांना रक्तदान म्हटले की, त्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण होते. अनेक लोकांना रक्तदान केल्यास शरिरावर साईड इफेक्ट होण्याची भिती असते. खरतर रक्तदान केल्यामुळे अनेक रूग्णांना नवे जीवनदान मिळते. रक्तदानदिनाचे औचित्य साधून ही भिती दुर करण्यासाठी काही टिप्स...

सडपातळ असणे

अनेक लोकांचा असा समज असतो की,  शरिराची रचना सडपातळ असल्या कारणाने मला रक्तदान करता येणार नाही. पण हा समज चुकीचा आहे.  जर तुमची रक्तदान करण्याची इच्छा असल्यास कमीत कमी तुमचे वजर ५० किग्रॅ इतके असले पाहिजे. शरिराच्या रचनेवरून रक्तदान करायचे की नाही हे ठरता येत नाही. खरतर, लठ्ठ असणाऱ्या लोकांना रक्तदान करण्यात अपात्र ठरवले जाते. कारण त्यांच्या शरिरास डायबिटीज सारखे अनेक रोग जडलेले असतात.

महिला रक्तदान करू शकत नाही

हा असा खूप मोठ्ठा गैरसमज आहे. रक्तदान करण्यापूर्वी शरिरामधील हीमोग्लोबिंग चेक केले जाते. हीमोग्लोबिंग हे एक शरिरातील प्रोटीन आहे ज्यामुळे शरिरातील रक्ताला लाल रंग येतो. हे प्रोटीन शरिराला ऑक्सिजन पुरवण्याचे कार्य पार पाडत असतात. शरिरामधील हीमोग्लोबिंग क्षमता कमी असल्यास रक्तदान करू शकत नाही. समाजाचे असे म्हणणे आहे की, पुरूषांपेक्षा महिलांमध्ये हीमोग्लोबिंगची क्षमता कमी असते. पण हा गैरसमज आहे. केवळ प्रेग्नंट महिला, हीमोग्लोबिंगची क्षमता कमी असलेल्या महिला रक्तदान करू शकत नाही. असे नाही की सर्वच महिला रक्तदान करू शकत नाहीत. 

रक्तदान केल्याने शरिरावर साईड इफेक्ट होतात

रक्तदान केल्याने आपले शरिर सुरक्षित राहण्यास मदत होते. कोणतेच नुकसान होत नाही. रक्तदान केल्याने ह्रदयविकार टळतात. तसेच शरिरात अतिप्रमाणात वाढणारे लोहाचे प्रमाण थांबले जाते.

एच आय व्ही सारख्या रोगांचा सामना 

जर तुम्ही रक्तदान करतेवेळेस सुरक्षितता बाळगली तर अशा रोगाची लागण होत नाही. आजकालच्या काळात रक्तदान करण्यापूर्वी अनेक सुरक्षताता बाळगली जाते. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही.