Fri, Mar 22, 2019 03:11
    ब्रेकिंग    होमपेज › Aarogya › मातीच्या माठातून पाणी पिण्याचे फायदे (व्हिडिओ)

मातीच्या माठातून पाणी पिण्याचे फायदे (व्हिडिओ)

Published On: Apr 17 2018 4:28PM | Last Updated: Apr 17 2018 4:43PMकोल्हापूर: पुढारी ऑनलाईन 

माती म्हणजे अनेक पोषकघटके आणि मिनरल्स  यांचा खजिना.  परंपरेनुसार आजही मातीच्या माठातून बरेचजण पाणी पितात. आपल्या पूर्वजांना त्याचे महत्त्व ठाऊक होते. याचा वापर करण्यामागे काहीतरी ज्ञान असावे . म्हणूनच त्यांनी मातीची भांडी, मडकी, माठ बनवायला सुरुवात केली.त्यानंतर मातीच्या मडक्यातून पाणी प्यायचे हे सगळ्यांच्या अंगवळणी पडले आणि ती आपली परंपरा बनली. 
मातीच्या माठाचे अनेक फायदे फायदे आहेत. उन्हाळ्यात खूप वेळ लोड शेडींग असते किंवा अनेकदा वीजपुरवठा स्थगित होतो. अशावेळी तुमची तहान भागवण्यासाठी तुम्ही फ्रिजमधील थंड पाण्यावर अवलंबून राहू शकत नाही.  

लहान लहान छिद्र असलेल्या मातीच्या माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. त्यामुळे माठात पाणी भरून ठेवणे स्वस्त आणि पर्यावरण पूरक आहे.  माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत मुबलक मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात. परिणामी त्या पाण्याने शरीराला फायदाच होतो.  

शरीरातील अॅसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते असते. शरीराच्या आतील वातावरण अॅसिडिक असण्यापेक्षा अल्कलाईन असेल तर तुमचे आरोग्य उत्तम राहील. यामध्ये माती ही नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते. त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाईन होते. त्याचबरोबर प्लॉस्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA नावाचे टॉक्सिक केमिकल असते. जे आरोग्याला धोकादायक असतात.  मातीच्या माठात असे केमिकल्स नसल्याने ते दूषित होत नाही तर ते पाणी अधिक आरोग्यदायी बनते आणि  मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते.  

यामध्ये सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे  उन्हाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळा बसतो. 
सर्दी, खोकला झाल्यावर आणि अस्थमा असणाऱ्यांना फ्रिजमधील थंड पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, माठातील थंडगार पाणी तुम्ही पिऊ शकता. कारण ते पाणी घशासाठी चांगले असते.