Wed, Oct 24, 2018 02:02होमपेज › Aarogya › स्तन कर्करोगाला प्रतिबंध करणारे १० सुपर फूडस्

स्तन कर्करोगाला प्रतिबंध करणारे १० सुपर फूडस्

Published On: Dec 07 2017 12:38AM | Last Updated: Dec 07 2017 12:38AM

बुकमार्क करा

स्तनाचा कर्करोग होण्यापासून कोणताही आहार वा पथ्य बचाव करू शकत नसले तरी कर्करोग होण्याचे प्रमाण कमी करण्यात मुख्य घटक वा भूमिका पोषणाची आहे. तुम्हाला याचे निदान झाले तरीही योग्य आहार आणि पोषण सांभाळल्यास बराच फरक पडून उपचारांमध्येदेखील सुधारणा होते. लक्षात ठेवण्यासारखे 12 योग्य आहार पुढीलप्रमाणे आहेत.

अळशीच्या बिया :

अळशीच्या बियांच्या तेलामध्ये ओमेगा- 3 फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे कर्करोगाच्या पेशींविरुद्ध संरक्षण होण्यासाठी मदत होते. अळशीच्या बिया हलक्या मसाल्यासह सॅलाडमध्ये वापरता येऊ शकतात. तुमच्या आवडत्या स्मूदीमध्ये वा ओटस्मध्येदेखील त्या वापरता येऊ शकतात.

 साल्मन मासा :

ओमेगा - 3 फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण असलेला अजून एक पदार्थ, साल्मन विटामिन बी 12 आणि डी साठी उत्कृष्ट आहे. शरीराला हवे असलेले योग्य पोषण अत्यावश्यक घटक देऊन पेशींची वाढ आणि कर्करोगाला प्रतिबंध करण्याचे नियमन करतो. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्तीला प्रोत्साहन मिळते. तुमच्या आवडत्या भाज्या आणि आरोग्यदायी चिकन रस्सा यामध्ये साल्मनचा प्रथिन स्रोताचा वापर करता येऊ शकतो.

ब्लूबेरीज :

ब्लूबेरीजमध्ये पॉलिफॅनॉलचा समावेश आहे. ज्यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत आणि त्याला आवश्यक असलेल्या व्हिटॅमिन्स आणि खनिजांनी युक्त आहेत, जे स्तनाचा कर्करोग प्रतिबंध होण्यास मदत करतात. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि फिटोकेमिकल्स आहेत, जे कर्करोगांच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी मदत करतात. न्याहारीकरिता ब्लूबेरी स्मूदी हा चांगला पर्याय असू शकतो.

ग्रीन टी :

महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा सर्वसामान्य कर्करोग आहे. सध्याच्या काही वर्षात, विट्रो आणि विवोच्या अभ्यासातून असे निर्देशित झाले आहे की, ग्रीन टीमध्ये कर्करोगाला विरोध करण्याचे प्रमाण अधिक असते. अँटी-इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असणार्‍या पॉलिफोनल्सचे जास्त प्रमाण असणार्‍या कॅमेलिया सिनेसिसच्या पानांपासून ग्रीन टी बनविला जातो. 

डाळींब :

एस्ट्रोजनची वाढ फिटोकेमिकल्समुळे दडपली जाते आणि कर्करोगाच्या गाठीच्या वाढीला प्रतिबंध करते, असे मानले जाते. यामध्ये युरोलिथिन-बी या नैसर्गिक घटकाचा समावेश असून स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींची वृद्धी होण्यास मनाई करतो. हा संपूर्ण फळ वा त्याचा रस घेतल्यास कर्करोग आणि त्याच्या प्रतिबंधाविरुद्ध लढा देण्यास मदत करतो.

 हळद :

बर्‍याच भारतीय घरांमध्ये सापडणारा मसाल्याचा पदार्थ म्हणजे हळद, कर्क्युमिन नावाने ओळखला जाणारा हा घटक कर्करोगाशी लढा देणारा मुख्य घटक असून स्तन, अन्ननलिका, फुफ्फूस आणि त्वचा यातील कर्करोगाच्या पेशींची वाढ होण्यासाठी प्रतिबंध करतो. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अ‍ॅँटी-इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असल्यामुळे स्तनाचा कर्करोग पसरण्याला आळा बसतो. तुमच्या रोजच्या आहारात चिमूटभर हळद वापरल्याने, कर्करोगाच्या पेशींशी लढा द्यायला मदत होते.

लसूण :

लसणामध्ये सल्फरचे घटक, फ्लेव्होन्स आणि फ्लेव्हनॉल्स असतात ज्यामुळे कर्करोगाच्या  सुरुवातीलाच प्रतिबंध करण्यासाठी मदत होते. ट्यूमरची वाढ होण्यापासून रोखले जाते आणि कर्करोगांच्या पेशी मारण्यासाठी हे परिणामकारक असल्याचेदेखील सिद्ध झाले आहे. रोज सकाळी लसणीच्या पाकळ्या खाल्याने वा तुमच्या इटालियन, स्पॅनिश आणि भारतीय पदार्थात लसणीचा वापर केल्यामुळे कर्करोगमुक्त आयुष्य जगण्यासाठी नक्कीच फायदा होईल.

पालक :

पालकसारख्या भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट आणि फायबर असतात. जे त्याला कर्करोगाशी लढा देण्यासाठी उत्कृष्ट साधन बनवतात. यामध्ये ल्युटिन नावाचे अँटी-ऑक्सिडंट असते, जे स्तन, तोंड आणि पोटाच्या कर्करोगांपासून वाचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावते. यामध्ये काही कार्टिनॉईटस् आहेत, जे रॅडिकल्सविरुद्ध परिणामकारक आहेत. जेवणात वा सॅलेडमध्ये ताज्या पालकाचा समावेश तुमच्या पोषणात वाढ करते.

 टॉमेटो :

टॉमेटोमध्ये मोठ्या प्रमाणात  अ‍ॅँटिऑक्सिडंट असतात, जे कर्करोगाविरुद्ध महत्त्वाचे परिणामकारक साधन म्हणून सिद्ध झाले आहेत. लाल रंगाच्या टॉमेटोमध्ये लायकोपेनचा समावेश असतो, ज्याची कर्करोग कमी होण्यासाठी मदत होते. कर्करोगाच्या पेशींमध्ये वाढ होण्यासाठी लायकोपेनमुळे प्रतिबंध झाल्याचे सिद्ध झाले आहे. रोज ताजे आणि कच्चे टॉमेटो खाल्ल्यास वा सूप पिण्यामुळे जोखीम कमी होऊ शकते.

 मशरूम्स :

मशरूम्समध्ये विटामिन बी 3 आणि बी 2 चा समावेश असतो. जे स्तनाच्या कर्करोगाची जोखीम कमी करण्यासाठी मदत करते. यामध्ये अँटी-इन्फ्लॅमेटरी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचीदेखील ताकद आहे. स्तनाच्या कर्करोगाची वाढ प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक एस्ट्रोजन पातळी मशरूम्समध्ये आहे. तसेच, तुमचे हार्मोन्स संतुलित ठेवते. पालेभाज्यांसह मशरूम्स शिजवता येतात. 
 

जाई खामकर