Thu, May 23, 2019 22:13
    ब्रेकिंग    होमपेज › Aarogya › जागतिक डेंग्‍यू प्रतिबंध दिवस विशेष : डेंग्‍यू लक्षणे व प्रतिबंधात्‍मक उपाय 

जागतिक डेंग्‍यू प्रतिबंध दिवस : डेंग्‍यू लक्षणे, प्रतिबंधात्‍मक उपाय 

Published On: Aug 10 2018 12:35PM | Last Updated: Aug 10 2018 1:06PMमुंबई : पुढारी ऑनलाइईन

डेंग्‍यू हा डासापासून पसराणारा एक गंभीर असा विषाणूजन्‍य आजार आहे. याविषयी लोकांच्‍यात जागरुकता निर्माण करण्‍यासाठी १० ऑगस्‍टला जागतिक डेंग्‍यू प्रतिबंध

दिवस साजरा केला जातो. यानिमित्त डेंग्यू तापाची लक्षणे व त्‍यावरील प्रतिबंधात्‍मक उपाय याविषयी माहिती खाललप्रमाणे : 

डेंग्‍यू ताप कशामुळे येतो ?

डेंग्‍यू  हा आजार 'एडीस इजिप्‍ती' या नावाच्‍या डासांच्‍या चाव्‍यामुळे पसरतो. डेंग्‍यूच्‍या विषाणूचे चार प्रकार आहेत. १,२,३,४ यापैकी कोणत्‍याही विषाणूमुळे डेंग्‍यू होवू शकतो. 

लक्षणानुसार डेंग्‍यूचे तीन प्रकार :

सौम्‍य डेंग्‍यू ताप (DF), रक्‍तस्‍त्रावी डेंग्‍यू ताप (DHF), शॉकसह रक्‍तस्‍त्रावी डेंग्‍यू ताप असे तीन प्रकार पडतात. हा आजार, ताप कोणालाही येउ शकतो. प्रामुख्‍याने लहान मुलांना याचा संसर्ग होण्‍याची शक्‍यता जास्‍त असते. 

काय आहेत डेंग्‍यू तापाची लक्षणे : 

अचानक ताप येणे.
तीव्र डोकेदुखी, डोळ्‍यांच्‍या खोबणीत वेदना होणे.
सांधेदुखी, अंगावर लाल चट्‍टे येणे.
मळमळ, उलट्‍या आणि भूक कमी होणे.
जठराची सूज, ओटीपोटात दुखणे.

डेंग्‍यू हेमेरेजिक तापाचे लक्षण :

रक्‍तस्‍त्रावित डेंग्‍यू ताप हा डेंग्‍यू तापाची गंभीर अवस्‍था आहे, याची सुरुवात तीव्र तापाने होते. डेंग्‍यू ताप वाढल्‍यास त्‍याचे रुपांतर 'डेंग्‍यू हेमोरेजिकमध्‍ये' हाोवू शकते. 
थकवा येणे, शरीरात रक्‍तस्‍त्राव झाल्‍याचे लक्षणे आहेत.
रक्‍तादाब कमी होउन 'डेंग्‍यू शॉक सिंड्रोम' होऊ शकतो. तसेच डोकेदुखी, भूख मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे आहेत. 

याचा प्रसार कसा होतो : 

स्‍वच्‍छ, साचलेल्‍या पाण्‍यात अंडी घालणारा एडीस इजिप्‍ती हा डास विषाणू पसरवतो. हे डास सकाळी व संध्‍याकाळी चावतात. या डासांची पैदास घरातील, परिसरातील भांडी, टाक्‍या, टाकाउ वस्‍तूत  साठविलेल्‍या पाण्‍यात होते. डेंग्‍यूच्‍या रुग्‍णास तो डास चावल्‍यास नंतर दुसर्‍या व्‍यक्‍तीस तो डास चावल्‍यास डेंग्‍यूची लागण होउ शकते. 

डेंग्‍यू  तापाचे निदान :  

डॉक्‍टरांना रुग्‍णाच्‍या लक्षणांवरुन याचे निदान होते. यासाठी रक्‍ताची तपासणी, रॅपिड ऍन्‍टीबोडी रॅपिड ऍन्‍टीजन टेस्‍ट, एलायझा टेस्‍ट, पीसीआर टेस्‍ट केले जाते. डेंग्‍यूमुळे रक्‍तातील प्‍लेटलेटची संख्‍या आणि पांढर्‍या  पेशींची संख्‍या कमी होते तर हेमॅटोक्रिट आणि सीरम अमायनोट्रान्‍सपरेजमध्‍ये वाढ होते. 

डेंग्‍यू उपचार पद्‍धती : 
यावर निश्‍ति असे उपचार नाहीत. रुग्‍णांना लक्षणानुसार उपचार दिले जातात. वरील लक्षणे आढळून आल्‍यास डॉक्‍टरांकडे योग्‍य ते उपचार आणि निदान करुन घ्‍यावेत. ­­­
खूप ताप येणे, उलट्‍या होणे किंवा रुग्‍णांची तब्‍येत अचानक खराब झाल्‍यास ताबडतोप रुग्‍णाला डॉक्‍डरकडे घेउन जावे. 
ज्‍या रुग्‍णांना मोठ्‍या प्रमाणात उलट्‍या, जुलाब, मळमळ व घाम येतो अशा रुग्‍णांच्‍या शरीरातील क्षार, पाणी कमी हाउ नये यासाठी घरी बनविलेल्‍या फळांचा रस व ओ. आर. एस. चे पाणी द्‍यावे. 

प्रतिबंधात्‍मक उपाय : 

डेंग्‍यू होऊ नये म्‍हणून या उपाययोजना करण्‍याची गरज आहे. 
आठवड्‍यातून किमान एकदा तरी घरातील पाण्याने भरलेली सर्व भांडी रिकामी करावी. 
पाण्याची भांडी झाकून ठेवणे. 
झाडांच्‍या कुंड्‍या, फुलदाण्‍या, फिशटँक इत्‍यादीतील पाणी नियमीत बदलावे. 
घराभोवतलची, परिसरातील जागा स्‍वच्‍छ,कोरडी ठेवावी. 
घराच्‍या भोवतालची व छतांवर असणारे अडगळीचे साहित्‍य ठेऊ नये.
घरातील दरवाजे, खिडक्‍या डास प्रतिबंधक जाळ्‍या बसवून घ्‍याव्‍यात. 
डेंग्‍यूच्‍या रुग्‍णांनी  डास चावणार नाही याची काळाजी घ्‍यावी, जेणेकरुन डेंग्‍यूचा प्रसार रोखता येईल.