Fri, Jan 24, 2020 17:19होमपेज › Aarogya › पाण्याच्या कमतरतेने उद्भवणाऱ्या समस्या

पाण्याच्या कमतरतेने उद्भवणाऱ्या समस्या

Published On: Dec 06 2018 3:21PM | Last Updated: Dec 06 2018 3:11PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आपल्या शरीरासाठी पाणी म्हणजे जीवन. पृथ्वीतलावरील सजीव सृष्टीला जिवंत राहण्यासाठी श्वासाइतकीच  पाण्याची आवश्यकता असते. भरपूर प्रमाणात पाणी पिल्याने आपले शरीर ताजेतवाने राहण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्या शरीरात ऊर्जेचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शुदध पाणी पिल्याने आपण असंख्य आजारावर मात करू शकतो. काही वेळा धावपळीच्या कामामुळे पाणी पिण्यास विसरून जातो, ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. पाण्याच्या प्रमाणाने  शरीरातील  विषारी घटक लघवी आणि घामाद्वारे बाहेर टाकले जातात. त्यामुळे अनेक आजारांपासून आपले शरीर वाचू शकते. म्हणून जाणून घेवूयात कमी पाण्यामुळे उद्भवणारे आजार...  

 १) पोटाची तक्रार

शरीराला प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. कमी पाणी पिल्याने डिहाइड्रेशनची समस्या निर्माण होते.  शरीरात पाण्याची मात्रा कमी पडल्यास पोटाची समस्या, अपचन, पोटात दुखणे हे आजार होतात. आपल्या शरीरातील कमी पाण्यामुळे टॉक्सिस शरीरातून बाहेर पडत नाहीत त्यामुळे शरीरात अनेक आजार उद्भवतात.      

२) शरीरातील थकवा

शरीरात पाण्याची मात्रा प्रमाणात असल्याने शरीरातील थकवा दूर होण्यास मदत होते. कमी पाण्यामुळे शरीराला थकवा आल्याने शरीरातील एनर्जी कमी होण्याची समस्या निर्माण होते. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास डोकेदुखी, ताण, गोंधळपणा, अस्वस्थ या सारख्या समस्या उद्भवतात.         
 

३) हदयरोगाची समस्या 

दिवसभरातील कामामूळे लोक पाणी पिणे विसरून जातात ते आरोग्यासाठी नुकसानकारक होत आहे. शरीरात पाण्याच्या कमतरतेने डिहाइड्रेड होवून  शरीरातील रक्त गोठून जाते. यामुळे रक्त प्रवाहामध्ये बाधा येवून  हदयरोगाच्या तक्रारी निर्माण होवू लागतात.       

४) चेहऱ्यावरील समस्या

चेहऱ्याची सुंदरता सगळ्यानाच आवडते. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी लोक काहीही करण्यास तयार असतात. परंतु त्यासाठी आपल्याला खास असे शुदध पाणी प्यावे लागते. आपल्या चेहऱ्यावरील सुंदरता ही पाण्याच्या मात्रेवर टिकून असते. त्यामुळे आता सुंदर दिसण्यासाठी भरपूर पाणी प्यावे लागणार आहे.  भरपूर प्रमाणात पाण्याची मात्रा असल्यास चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने चेहऱ्यावर डाग, मुंरूमे, सुरकूत्या यांसारख्या समस्या  वाढतात.  

५) लठ्ठपणाची समस्या 

बाहेरचे पदार्थ खाल्यानेच लठ्ठपणा वाढतो असे नाही तर कमी पाणी पिल्याने  ही लठ्ठपणा वाढतो. पाणी कमी पिल्याने आपल्या शरीराचे वजन वाढून लठ्ठपणाचे विकार  होतात. 

६) सांधेदुखीची समस्या

शरीरातील साध्यांचे दुखणे कमी करण्यासाठी जास्तीत-जास्त पाणी पिणे फायदेशीर ठरते. पाण्याच्या कमतरतेने साध्यांतील चिकटपणा कमी होवून सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. 

७) तोंडातील उग्र वास  

कमी पाणी पिल्याने तोडातून दुर्गंध येण्याची समस्या निर्माण होत असते. पाण्याच्या कमतरतेने तोंड कोरडे होऊन तोंडामध्ये जंतू तयार होण्यास सुरूवात होते व तोंडातून उग्र वास येतो. त्यामुळे या समस्येपासून वाचण्यासाठी पाणी पिणे गरजेचे आहे.